रविवार, 11 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 मार्च 2017 (10:30 IST)

औरंगाबादमध्ये घाटी रूग्णालयातील डॉक्टरला मारहाण

crime in aurangabad
औरंगाबादेतील घाटी या शासकीय रूग्णालयातील डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा बंद केली आहे. घाटीतील निवासी डॉक्टरांनी मारहाणीच्या निषेधार्थ रूग्णालयासमोर शांततेत आंदोलन केलं. रात्री उशिरा एका रूग्णाचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याला पाहण्यासाठी नातेवाईकांनी डॉक्टर विवेक बडगे यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टर विवेक यांना मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. याआधी मुंबई आणि धुळ्यात डॉक्टरला मारहाण केल्याची घटनाघडली आहे.