शुक्रवार, 19 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (15:25 IST)

मंदिरांमध्ये मास्कशिवाय हजारो भाविकांची गर्दी

Crowds of thousands of devotees without masks in temples
कोरोना विषाणूची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्यभरात निर्बंध लादले गेले आहेत. लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे, परंतु धार्मिक स्थळांवर त्यांचा प्रभाव‍ दिसत नाहीये. मंदिरांसह बाजारपेठेतही मोठी गर्दी असते. चिंतेची बाब म्हणजे बहुतेक लोक संसर्ग रोखण्याकडे दुर्लक्ष करतात.
 
जागोजागी गर्दी टाळणं गरजेचं असल्यामुळे न्यू ईयर सेलिब्रेशनही फीकं पडलं परंतु नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. 
 
नवीन वर्षात भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी केली असताना काल रात्री 9 वाजता मंदिर बंद करण्यात आलं होतं. शनिवारी सकाळी 6 वाजेपासून साईदर्शन पुन्हा सुरु झाले असून कडाक्याच्या‌ थंडीतही भाविक साई दर्शनासाठी गर्दी करत आहेत. तर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहे.
 
इकडे शेगावात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली आहे. तर कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली.
 
अनेक लोक नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येतात मात्र सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाच्या वतीने प्रत्येक तासाला 1500 लोकांना सोडण्यात येणार आहे. या शिवाय श्री क्षेत्र रेणुका माता मंदिर माहूरगड येथे भक्तांची गर्दी होता आहे. सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. अशात कोरोनाचे कितपत काटेकोर पालन होणार ही चितेंची बाब आहे कारण एवढ्या गर्दीत सामाजिक अंतर राखणे तसेच मास्क लावणे हे नियम पाळत असल्याची शक्यता फारच कमी आहे.