शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (15:10 IST)

दोन लहान मुलींसह बेपत्ता महिलेस शोधण्यात नेवासा पोलिसांना यश

तालुक्यातील चिलेखनवाडी येथून दोन लहान मुलींसह बेपत्ता असलेल्या महिलेला शोधण्यात नेवासा पोलिसांना यश मिळाले आहे. तालुक्यातील चिलेखनवाडी येथील महिला शितल विठ्ठल बोरुडे (वय 30 वर्षे) रा. बोधेगांव ता. शेवगांव ह.मु चिलेखनवाडी ता. नेवासा जि. अहमदनगर ही तिच्या मुली राजश्री विठ्ठल बोरुडे (वय 10 वर्ष)  तन्वी विठ्ठल बोरुडे (वय 07 वर्षे) दोघी रा. बोधेगांव ता. शेवगांव हमु चिलेखनवाडी ता नेवासा या दि. 15 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजे पासून बेपत्ता होत्या.

महिलेचे वडिल बाप्पु रामा निकाळजे (वय 55 वर्षे) व्यवसाय मजुरी रा. चिलेखनवाडी ता. नेवासा यांनी दि.22 डिसेंबर 2021नेवासा पोलीस ठाण्यात खबर दिली होती.त्यानुसार नेवासा पोलिस ठाण्यात रजिस्टर न. 103 /21 नुसार मिसिंग दाखल होती. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांचे पथकाने कसोशीने शोध घेतला असता दि.31 डिसेंबर रोजी सदर महिला व तिच्या दोन मुली नेवासा तालुक्यातील गेवराई येथे सुखरुप मिळुन आलेले आहेत.
 
सदर महिलेने स्वखुशीने दुसरा विवाह केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.