शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (12:37 IST)

भावाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ७ महिन्याची गरोदर असताना प्रसूती

औरंगाबादमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. या धक्कादायक प्रकरणात भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार करून गर्भवती केल्याची बातमी समोर आली आहे. पीडितेची घाटी रुग्णालयात प्रसूती झाली आहे. 
 
या प्रकरणी शहरातील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधम भावाला अटक केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार गोलवाडी येथील 17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर तिच्या मावस भावाने वारंवार अत्याचार केला. मुलगी गर्भवती राहिली मात्र भीतीमुळे तिने घरच्यांना याबाबत कळू दिले नाही. पण पीडित तरुणीला पोटदुखीचा त्रास होत असल्याने नातेवाईकांनी तिला २९ डिसेंबर रोजी घाटी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर पीडिता सात महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले तेव्हा सर्वानाच धक्का बसला.
 
नंतर पीडितेची सात महिन्याची गरोदर असताना घाटी रुग्णालयात प्रसूती झाली. हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे कुटुंबातील लोकांनी पीडितेला विश्वासात घेतलं आणि विचारपूस केल्यावर मावस भावानेच आपल्यावर अत्याचार केल्याच तिने सांगितले. नंतर नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली त्यावरुन गुन्हा दाखल करत आरोपीला भावाला अटक करण्यात आली आहे.