शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 जुलै 2022 (11:04 IST)

सध्याचं राजकारण हे 100 टक्के सत्ताकारण - नितीन गडकरी

nitin
"सध्या राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? याबद्दल विचार केला पाहिजे," असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

गडकरी पुढे म्हणाले, "महात्मा गांधी यांच्या काळात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते. आता मात्र राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाले आहे. त्यामुळे कधी कधी आपण राजकारण कधी सोडतोय असं वाटायला लागलंय."
 
नागपुरातील ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.
 
"एखादा व्यक्ती जीवन किती जगला, यापेक्षा कसा जगला हे महत्त्वाचा आहे. माणसाच्या कर्तृत्वाचा निवडून येण्याशी काही संबंध नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येतात. राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही," असंही ते म्हणाले.