शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 12 जानेवारी 2022 (09:14 IST)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं यांना ही कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्या लोकांना काळजी घेण्याची विनंती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी रात्री त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी दिली. गडकरींनी ट्विटमध्ये लिहिले की, 'मी आज सौम्य लक्षणांसह कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मी सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करत आहे. मी स्वतःला आयसोलेट केले आहे आणि होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी सेल्फ आयसोलेशन करून चाचणी करून घ्यावी.
 
याआधी सोमवारीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे ही कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तेही सध्या त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाईनमध्ये आहेत. आज दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने त्यांची तपासणी केली आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले.सध्या देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. त्याच वेळी, कोरोना विषाणूचा एक नवीन आणि अधिक संसर्गजन्य व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे धोका देखील वाढला आहे.