सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जानेवारी 2022 (22:59 IST)

थंडीमुळे मृत्यू झालेल्या माकडावर अंत्यसंस्कार आणि मृत्यूभोज ला 1500 लोकांची उपस्थिती

मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील दलुपुरा गावातील लोकांनी थंडीमुळे मरण पावलेल्या माकडाचे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि नंतर तेराव्या निमित्त मृत्यूभोज दिले. शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आणि सुमारे 1,500 लोक उपस्थित होते. 
29-30 डिसेंबरच्या रात्री थंडीमुळे गावात माकडाचा मृत्यू झाला होता. यानंतर गावकऱ्यांनी 30 डिसेंबरला विधिवत माकडावर अंत्यसंस्कार केले. दलुपुरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुन सिंह चौहान यांनी सांगितले की, त्यांच्या गावातील सर्व रहिवासी माकडांना हनुमानाचे रूप मानतात. 
गावातील सरपंच म्हणाले, 'आमच्या गावात माकड मेले तर आम्ही गावात प्रथेप्रमाणे त्याचे अंत्यसंस्कार तसेच करतो ज्या प्रमाणे  गावातील लोकांचे अंत्यसंस्कार केले जाते. याच अनुषंगाने ग्रामस्थांच्या सहकार्याने शुक्रवारी आमच्या गावात माकडाच्या मृत्यूनिमित्त मृत्यू भोजचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये सर्व कार्यक्रम हिंदू रीतिरिवाजानुसार पार पडले. चौहान म्हणाले की, कार्यक्रमाला सुमारे 1,500 लोक उपस्थित होते आणि त्यांनी प्रसाद घेतला.