शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 30 एप्रिल 2018 (16:55 IST)

डी.के. जैन राज्याचे नवे मुख्य सचिव

राज्याच्या मुख्य सचिवपदी डी.के. जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमित मलिक यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांच्याकडे मुख्य सचिवपदाची सूत्रे सोपवण्यात आली. राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्या नावाचीही चर्चा होती. 
 

मेधा गाडगीळ आणि डी.के.जैन हे दोघेही 1983 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 29 ऑगस्ट 1983 रोजी ते आयएएस अधिकारी म्हणून रुजू झाले. कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून जैन यांची ओळख आहे.