बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (11:21 IST)

डीएसकेंना अ‍ॅड‍मिट करण्याची आवश्यकता : डॉक्टर

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सखारा कुलकर्णी यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. डीएसके यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर ससून रुग्णालयातल्या दहा डॉक्टरांच्या पथकाने हा अहवाल दिला आहे. हा अहवाल न्यायालयासोर सादर करण्यात येणार आहे.
 
गुंतवणूकदारांचे 230 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी डीएसकेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर त्यांना पोलिसांनी शनिवारी दिल्लीतून अटक केली होती. त्यानंतर मध्यरात्री ते कोठडीत भोवळ येऊन पडल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 
 
ससूनध्ये त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या वकिलांनी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. त्यानुसार त्यांना पुन्हा ससूनरुग्णालयात हलविण्यात आले.