गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018 (10:54 IST)

शिवरायांना ट्विटद्वारे राहुल, मोदींचा मुजरा

जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार्‍या संदेशांचा सोशल मीडियावर वर्षाव होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मराठी भाषेत टिव्ट करून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला आहे.
 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अर्थात शिवजन्मोत्सव सोहळा देशभरात मोठ्या दिमाखात साजरा झाला. 
 
विविध राजकीय पक्ष, सार्वजनिक मंडळांनी जय्यत तयारी केली होती. ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 
 
शिवप्रेमीही छत्रपती शिवरायांना अभिवादन करणारे मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करत होते. राहुल गांधींनीही ट्विट करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणून एकात्मता व सौहार्दतेचा संदेश देणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्तम माझा मानाचा मुजरा! असे मराठी भाषेतील ट्विट त्यांनी केले आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही छत्रपती शिवाजी महाराजांना ट्विटरद्वारे अभिवादन केले आहे. जयंतीनिमित्त शिवरायांना वंदन करतो. जय शिवाजी! असे त्यांनी ट्विटमध्ये  म्हटले आहे.