गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (08:39 IST)

पॉर्न वेबसाईट्सवर बंदी आणा, विवाहितेची सुप्रीम कोर्टात मागणी

भारतातील पॉर्नोग्राफिक वेबसाईट्सवर बंदी आणावी, अशी मागणी मुंबईतील 27 वर्षीय विवाहितेने सुप्रीम कोर्टात केली आहे. 'माझ्या 35 वर्षीय पतीला ऑनलाईन पॉर्नोग्राफीची सवय जडली आहे. दिवसातला बराचसा वेळ तो पॉर्न साईट्सवर ब्राऊजिंग करण्यात घालवतो. त्यामुळे माझ्या वैवाहिक आयुष्याची वाट लागली आहे. सुप्रीम कोर्टाने भारतात पॉर्न साईट्सवर बंदी आणावी.' असं तरुणीने सुप्रीम कोर्टाला सांगितलं.

पती फँटसीमध्ये रममाण झालेला असतो. त्याचं ना संसाराकडे लक्ष आहे, ना माझ्या शारीरिक गरजांकडे. उत्साह नसल्यामुळे दैनंदिन कामंही तो व्यवस्थित करत नाही. आपल्या इच्छेविरोधात अनैसर्गिक ओरल सेक्स करण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा दावाही तिने केला आहे. पॉर्न सहज उपलब्ध होत असल्यामुळे भारतात सेक्सविषयक गुन्हे आणि वैवाहिक वादांमध्ये वाढ झाल्याचंही तिने सांगितले आहे.