मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 एप्रिल 2022 (15:07 IST)

नकली नोटा चोरून चोरट्यांचा डान्स

बीडच्या अंबाजोगाई शहरातील वाघाळा रोड परिसरात वरद पार्क येथे एका दुकानांत चोरटे शटर तोडून शिरले त्यांना लहान मुलांच्या खेळण्यातील 200,500, आणी 2000 चे नोट सापडले त्यांना त्या नोटा खरं असल्याचे वाटले. त्यांनी चक्क डान्स केला. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.  
 
अंबाजोगाई शहरातील वाघाळा रोडवरील वरद पार्क येथे सूर्यकांत जानसाराव तेलंग यांचे दुकान आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुकानात दुकानाचे शटर तोडून चोरटे शिरले त्यांच्या हाती मुलांच्या खेळण्यातील दोनशे ,पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा सापडल्या. त्यांना इतका आनंद की त्यांनी दुकानात डान्स केला. नंतर त्यांनी गल्ल्यातील सहा हजार रुपये काढले आणि दुकानाच्या समोर लावलेली सूर्यकांत तेलगांची दुचाकी देखील पळवली. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी तेलंग यांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार केली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांचा शोध घेत आहे.