1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 एप्रिल 2022 (13:06 IST)

राज्यातील तापमानाने एप्रिल महिन्यात उच्चांक गाठला,उकाडा वाढला

Temperatures in the state rising  in April
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला असून प्रचंड उकाडा वाढला आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठला असून नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली आहे. (Heat Wave in Maharashtra) उष्णतेचा हा वाढता पारा अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. याचदरम्यान आता हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे.
 
भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील काही दिवसांत भारताच्या अनेक भागांमध्ये- महाराष्ट्रापासून ओडिशा (Odisha) आणि बंगालपर्यंत उष्णतेच्या लाटेच्या स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. उष्णतेची लाट म्हणजे जेव्हा कोणत्याही ठिकाणचे तापमान मैदानी भागात 40 अंश सेल्सिअस, किनारपट्टीच्या भागात 37 अंश आणि टेकड्यांमध्ये 30 अंशांच्या पुढे जाते, अशी व्याख्या भारतीय हवामान खात्याने केली आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी कमाल तापमान4.5 ते 6.4 अंश सेल्सिअस असते जे त्या दिवसाच्या सामान्य तापमानापेक्षा जास्त असते तेव्हा उष्णतची लाट घोषित केली जाते.
 
प्रमुख शहरांतील तापमान
वर्धा 45.0, ब्रह्मपुरी 44.9, चंद्रपूर 44.6, अकोला44.0, नागपूर 43.6, गोंदिया 43.4, वाशिम 42.5, अमरावती42.6, मालेगाव 42.2, परभणी 41.9 नांदेड41.8, बुलढाणा 41.0, औरंगाबाद40.4, सोलापूर40.4, उस्मानाबाद 41.3, नाशिक 39.6, पुणे 39.1, कोल्हापूर  38.6 
 
सध्या उन्हाचा चटका वाढला आहे. ही तर एप्रिलची (April) सुरुवात आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान (Temperature) 43-44च्या आसपास गेले आहे. तर पुण्यात 40च्या दरम्यान आहे. मात्र या वाढच्या उन्हामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. त्यात हवामान विभागाने महहहतवाची  माहिती दिली आहे. पुणेकरांचे टेन्शन त्यामुळे अधिकच वाढणार आहे. 14 एप्रिलपर्यंत दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार असल्याने पुणेकरांना कडक उन्हापासून दिलासा मिळाला नाही, 
 
 पुणे, चिंचवडमध्ये शुक्रवारी सर्वाधिक 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या काही दिवसांत पुण्यात पावसाची शक्यता नाही. पुढील काही तास अंशतः ढगाळ वातावरण राहील, त्यानंतर आकाश निरभ्र होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.