शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (21:20 IST)

डंके की चोटपर आमचा लढा सुरूच राहील, आम्ही माघार घेणार नाही : सदावर्ते

जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. डंके चोटपर आमचा लढा सुरूच राहील, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केलं. ते आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करत होते. विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं सदावर्ते यांनी सांगितलं.
 
देशभरातील लोक कष्टकऱ्यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आमचा  बंद आहे. 95 टक्के कष्टकरी दुखवट्यात आहेत. आमच्यासाठी दुखवटा आहे. सरकारसाठी संप आहे. कोल्हापूरच्या टोलनाक्यावर संतोष शिंदे आणि इतरांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यासोबतच्या 35 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही पोलीस ठाण्याला फोन लावून कारणं विचारली. या कर्मचाऱ्यांना नाहक सहातास डांबून ठेवण्यात आलं होतं. आम्ही आमचा कायद्याचा बडगा दाखवला तेव्हा फ्यॅ फ्यॅ झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घळवे यांना विचारमा करण्यात आल. त्यानंतर कर्मचाऱ्यांना सोडण्यात आलं. हे कर्मचारी कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना अटक केली. त्यांनी कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत. त्यांनी कोणतीही निदर्शने केली नाही. तरीही अटक केली. त्यामुळे संतोष घोळवेंना निलंबित करा, अशी आमची मागणी आहे, असं ते म्हणाले.