शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (16:20 IST)

दशमी व एकादशीदिवशी विठ्ठलाचे दर्शन बंद राहणार, माघी यात्रा नियम व अटीनुसार होणार

कोरोनाचे सावट अद्यापही संपले नाही. बरोबर कोरोनाची लस अनेकांना देणे बाकी आहे. यामुळे माघी यात्रा नियम व अटीनुसार होणार आहे. मात्र दशमी व एकादशीदिवशी विठ्ठलाचे दर्शन बंद राहणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.
 
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सह. अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास येथे घेण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवार, सदस्य संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, माधवी निगडे, शकुंतला नडगिरे, साधना भोसले यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
 
पुढे सह अध्यक्ष ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, शासनाने २८ फेब्रुवारी २०२१ तारखे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीचे परंपरेचे नियम होणार आहे. मंदिराच्या बाहेरचा विषयासंदर्भात शासन निर्णय घेईल. असे ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.