सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बारामती , शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (14:10 IST)

Crime News:नदीत आढळले मृतदेहाचे तुकडे

crime
भीमा नदी पात्रात 30 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने अतिशय क्रूरपणे खून करून त्याचे मृतदेहाचे पाच तुकडे करून प्लास्टिकच्या पिशवीत आढळून आले आहे.  यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समजताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
अद्याप या मृतदेहाची ओळख पटली नसून या रहस्यमय क्रूर खूनाचा तपास करण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भिगवणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह पोलीस पथकान घटनास्थळी भेट देऊन तपासणी सुरू केली आहेत.