सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 एप्रिल 2023 (16:15 IST)

धक्कादायक! कुत्र्यांनी अर्भकाचे तोडले लचके

Kolhapur News कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय परिसरात कुत्र्यांनी मृत अर्भकाचे लचके तोडले. सीपीआरमध्ये पीएम रुमच्या शेजारी शेडमध्ये घडलेला हा प्रकार निदर्शनास आल्यावर एकच खळबळ उडाली.
 
येथे मृत अर्भक कोणी टाकले किंवा कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे कचर्‍यातून कुत्र्यांनी ओढून आणले याचा शोध सुरु आहे.
 
सीपीआरमध्ये दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात तसेच प्रसूती विभागात देखील गर्दी असते. गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पीएम रुमच्या जवळ पत्र्याच्या शेडमध्ये भटक्या कुत्र्यांकडून मृत अर्भकाचे लचके तोडले जात होते. काही नागरिकांना हा प्रकार लक्षात आल्यावर याची माहिती येथील कर्मचार्‍यांना देण्यात आली तेव्हा पोलिसही सीपीआरमध्ये पोहोचले. पोलिसांनी मृत अर्भकाचे अवशेष ताब्यात घेतले आणि शोध सुरु केला आहे.