संबंधित माहिती
- जळगाव: देवीची मूर्ती अंगावर पडून तरुणाचा दुर्देवी मृत्यू
- जळगावच्या शेतकरीपुत्राने शोधली पावडर– कृषिमंत्र्यांनी घेतली दखल
- राज्यात मुसळधार पावसाची शक्यता धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार
- Jalgaon : ईडी कडून जळगावातील राजमल लखीचंद समूहावर छापे
- छत्रपती संभाजीनगर-जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील गौताळा अभयारण्यात पर्यटकांना 15 ऑगस्टपर्यंत बंदी
दिवाळीची साफसफाई करताना मृत्यू
Jalgaon News जळगाव शहरातील बोहरा बाजार येथील फटाका विक्रेत्याच्या घराची साफ-सफाईसाठी पाठवण्यात आलेल्या बालमजुराचा उघड्या विद्युत तारेवर पाय पडून जागीच मृत्यू झाला. मूळ मन्यारखेडा-भुसावळ येथील रहिवासी सुनील संजय चव्हाण (वय 16) असे मृतकाचे नाव आहे.
दिवाळीचा सण आल्याने घर असो वा दुकान सर्वींकडे साफ-सफाईची कामे सुरू आहेत. अशात साफसफाई करताना निष्काळजीमुळे एका अल्पवयीन मुलाच्या जिवावर बेतली आहे. ही घटना गणेश कॉलनीत घडली. सुनील हा कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काम करत होता. बोहरा बाजारात अग्रवाल फॅन्सी फटाके दुकानाचे मालक अनिल अग्रवाल यांनी सुनील आणि त्याचा मित्र सागर सुभाष शिंदे अशा दोघांना त्यांच्या घरी साफसफाई करण्यासाठी पाठवले होते. बुधवारी सकाळी घरची साफसफाई करत असताना सुनीलचा पाय खाली पडलेल्या विद्युत तारेवर पडला आणि तारेतून पूर्ण क्षमतेने वीजप्रवाह सुरू असल्याने सुनीलला जोरदार विजेचा झटका लागून तो जागेवर कोसळला.
सुनीलला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले.
