शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 एप्रिल 2018 (15:26 IST)

प्रियकरासोबत लॉजवर गेलेल्या प्रियसीचा मृत्यू

हॉटेलमध्ये प्रियकरासोबत गेलेल्या तरुणीने  औषधांचं अतिसेवन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई येथील भिवंडीतील ही घटना आहे. तरुणीने सेवन केलेल्या औषधांना महाराष्ट्र राज्यात विक्रीस  बंदी आहे. मात्र तरीही याची खुलेआम विक्री होत असल्याचे समोर आले आहे. या औषधांच्या अतिसेवनाने हायपरटेन्शनने सर्कुलेटरी फेल्युअर होऊन व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, असं डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. आधी या मुलीने सेक्स पॉवरच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस झाल्यामुळेच मृत्यू झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात येत होते. मात्र तिचा मृत्यू नशेच्या औषधाचं अतिसेवन केल्याने झाल्याची प्राथमिक माहिती शांतीनगर पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी  या तरुणीच्या प्रियकराची चौकशी करुन त्याला सोडून दिले आहे. ही 29 वर्षीय तरुणी मुंब्रा येथील अमृतनगरमधल्या रशीद कंपाऊंडमध्ये राहते.