बुधवार, 26 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (10:35 IST)

प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू

Death of student during Prabhat feri
नांदगाव तालुक्यात जातेगाव येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रभातफेरी दरम्यान एका माध्यमिक शाळेत  इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पूजा दादासाहेब वाघ (15)असे या मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. 
वृत्तानुसार, नांदगाव तालुक्यात जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकणारी पूजा वाघ प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेतील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपवून ग्राम पालिकेच्या धवजरोहणाच्या कार्यक्रमासाठी होणाऱ्या प्रभात फेरी दरम्यान भारत माताकी जय अशा घोषणा देत असताना चक्कर येऊन खाली कोसळली. तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. नंतर तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नांदगाव नेताना तिचे निधन झाले. पूजाला जन्मापासूनच श्वासाचा त्रास होता. तिच्या फुफ्फुसात छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. मात्र त्यापूर्वीच तिला मृत्यूने गाठलं.  तिच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
Edited By- Priya Dixit