बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. प्रजासत्ताक दिन
Written By

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2024 Republic Day Wishes 2024

republic
जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे 
शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे 
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
 
विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये, 
अभिमान आत्म्याचा… 
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया
आपल्या महान राष्ट्राला.. 
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
स्वप्न सगळेच बघतात, स्वत:साठी इतरांसाठी, 
आपण आज एक स्वप्न बघूया, देशासाठी आपल्या सर्वांसाठी,
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
 
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या 
सर्व भारतीयांना खुप खुप शुभेच्छा!
 
अतिशय समृद्ध इतिहास आणि
वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो
आणि या गोष्टीचा अभिमान बाळगतो.
प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा
 
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडविला…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
 
देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
 
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग
अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारत मातेचे गुण गान
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
 
तनी-मनी बहरुदे नव-जोम
होऊदे पुलकित रोम-रोम
घे तिरंगा हाती
नभी लहरु दे उंच उंच
जयघोष मुखी
जय भारत- जय हिंद, गर्जुदे आसमांत
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
 
एक देश, एक स्वप्न
एक ओळख, आम्ही भारतीय..
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
 
माझा भारत महान,
भारतीय असण्याचा मला आहे अभिमान
भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
 
या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
 
सुजलाम सुफलाम, मलयज शीतलाम
शस्य श्यामलाम मातरम…
प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा
 
तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा