1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 17 एप्रिल 2024 (10:52 IST)

एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

eknath khadse
मुक्ताईनगर जळगाव : एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून ही धमकी कॉल वरून आल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या गटाचे नेते आहेत. तसेच एकनाथ खडसे यांना दाऊद आणि छोटा शकील गँग यांच्या काढून धमकी आली अशी माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांना वेगवेगळ्या चार नंबरवरून धमकी देण्यात आली असून, मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार नोंदवली असून पोलीस तपास करीत आहे. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या गँगकडून एकनाथ खडसे यांना धमकीचा फोन आल्याची माहिती मिळाली आहे. 
 
वेगवेगळ्या क्रमांकावरून एकनाथ खडसे यांना १५ आणि १६ एप्रिल रोजी फोन आला होता. यामध्ये देशासह परदेशातील क्रमांकांचा सहभाग आहे. छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार असल्याचं धमकी देणाऱ्याने सांगितलं. तसेच, तुम्ही, तुम्हाला सांगितल्यानंतर काहीच केले नाही. धमकी देणाऱ्याने सांगितलं की, हे लोक तुम्हाला मारणार आहेत. व या नंबरचे लोकेशन लाखनऊ, अमेरिका येथील आहे. यानंतर एकनाथ खडसे या बाबत पोलिसात तक्रार नोंदवली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दाखल घ्यावी अशी विनंती एकनाथ खडसे यांनी केली आहे. भाजपमध्ये जाणार असल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी केला आहे.  त्याचं स्वागत आहे. ते पक्ष प्रवेश करत असतील तर असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Edited By- Dhanashri Naik