शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 (09:51 IST)

एकनाथ खडसेंनी भाजप यावं ही आपली ही व सर्वांची इच्छा - खासदार रक्षा खडसे

raksha khadase
Photo- Instagram
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे  हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता याच चर्चेदरम्यान एकनाथ खडसे यांच्या सून भाजपच्या खासदार रक्षा खडसे  यांनी सूचक विधान केलं असून यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
 
काय म्हणाल्या रक्षा खडसे?
एकनाथ खडसेंनी भाजप यावं ही आपली ही व सर्वांची इच्छा असल्याचे मत खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसात अनेक मोठे नेते पक्षात प्रवेश करत असून एकनाथ खडसे यांनीही भाजप यावं ही सर्वांची इच्छा असल्याचे सूचक विधान ही खासदार रक्षा खडसे यांनी केले आहे. एकनाथ खडसे यांचा भाजपचा पक्षप्रवेश हा जरी वरिष्ठ पातळीचा निर्णय असला त्यावर एकनाथ खडसे यांच्या मनात काय हे सगळं घडल्यानंतरच आपल्यासमोर येणार असल्याचे खासदार रक्षा खडसे म्हणाल्या.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor