सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जून 2023 (22:03 IST)

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुझा लवकरच दाभोळकर होणार अशी धमकी ट्विटरवरून देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर या ट्विटर हँडलवरुन ही धमकी देण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
 
याबाबत गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आहे. राज्यात जातीय सलोखा टिकून राहिला पाहिजे. राज्यातील वातावरण ठीक नाही ,आमचं सरकार असताना असे प्रकार घडत नव्हते अस माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटलयं.
 
दरम्यान,निलेश राणेंच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कालपासून निलेश राणे, नितेश राणे यांच्याविरोधात जेलभरो आंदोलन सुरु केलं आहे.  राष्ट्रवादीचे मुंबई उपनगरातील सर्व पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
 
नितेश राणेंचं ट्विट
राणेंना धमकी देऊन काहीच फायदा नाही आम्ही कधीही कोणाच्या धमकीला भिक घातली नाही, समोर आलात तर दोन पायावर घरी परत जाणार नाही लक्षात ठेवा. राहिला विषय पवार साहेबांचा तर त्याच्यात आणि औरंगजेबमध्ये साम्य आढळणं साहजिक आहे. माझ्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आंदोलन करणार असेल तर मी त्यांना चॅलेंज करतो की हिम्मत असेल तर मुंब्रा शहरामध्ये म्हणजेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात हेच आंदोलन करून दाखवावे असे आव्हानही राणेंनी दिलं आहे.