शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (08:43 IST)

15 दिवसांनी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय: आरोग्य मंत्री टोपे

Decision to start school after 15 days: Health Minister Tope 15 दिवसांनी  शाळा सुरू करण्याबाबत निर्णय: आरोग्य मंत्री टोपेMarathi Regional News In Webdunia Marathi
राज्यात वाढत्या कोरोनामुळे पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. शाळा बंद करण्याच्या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे.
यावर राजेश टोपे म्हणाले की, शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती पाहून पुनर्विचार केला जाईल.
लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेकांनी शाळा सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत 15 दिवसांचा अंदाज घेऊन मुख्यमंत्र्यांच्या विचाराने निर्णय घेतला जाईल.राज्यात आपण 90 टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला आहे. दोन डोस 62 टक्के लोकांना दिला आहे.
तसेच 15 ते 18 वयोगटातील 42 टक्के लसीकरण केले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. स्कूल कॉलेज बंद असल्यामुळे आता घरोघरी जावून लसीकरण करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.