शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (22:22 IST)

मुख्यमंत्र्यांना वाटलं तर अंधेरीची जागा लढवू शकतो- दीपक केसरकर

Deepak Vasant Kesarkar
"अंधेरी पोटनिवडणुकीत आम्ही घाईने उमेदवारी का भरावी? बहुमत नसतानाही त्यांनी मुख्यमंत्रिपद दिलं. एखाद्या आमदारकीसाठी त्यांच्याशी संघर्ष करणार असं नाही. ही आमदारकी आमची असं शिंदे साहेबांना वाटलं तर लढूया. भाजप निर्णय बदलू शकतं असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले, उमेदवारीबाबत काहीही बोलणं थोडं घाईचं ठरेल. युती म्हणूनच असेल. शिंदे-फडणवीस साहेब एकत्र निर्णय घेतील.
 
"भाजपने उमेदवार घोषित केला म्हणजे अंतिम ठरलं असं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येऊन घोषणा करतील. पक्षाचे नेते असतील. जे बोललं जातंय, लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी केलं जातं. वेळ कमी असतो. मोजकी मुदत असते. त्यांचा दोष म्हणता येणार नाही", असं केसरकर म्हणाले.
 
"हिंदुत्वापासून तुम्ही लांब गेला आहात. त्रिशूळ, उगवता सूर्य चिन्हामागे हिंदुत्वाचं लॉजिक आहे. उगवता सूर्य, त्रिशूळ हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे. जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेले त्यांना त्रिशूळ, सूर्य हे चिन्ह वापरता येणार नाही", असं केसरकर म्हणाले.
 
युतीसाठी तुम्ही तयार होता का?
"40 लोकांमुळे के मुख्यमंत्री राहू शकले. ते आजही हिंदुत्वाच्या विचारांवर आहेत का? कांग्रेस-राष्ट्रवादीसोबत ते अजूनही आहेत. आमदार-खासदार संपले असले तर पक्षही संपला असता. सरकार बनवायला तुम्ही का तयार झालात याचं उत्तर लोकांना मिळायला हवं.
 
युती घडवायला तुम्ही तयार होता का? भाजप नेत्यांचे कॉल स्वीकारलेले नाहीत. हिंदुत्वावर राहायचं नाही की यावर वाद झाला. भाजपबरोबर युती होती आणि निवडणूक जिंकलो होतो.
 
20 आमदार निघून गेले. उरलेले 20 आमदार भेटायला आलेले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जायला नको असं आमदार सांगत होते. तुम्ही सांगितलंत की तुम्हाला यांच्याबरोबर जायचं असेल तर जा", असं केसरकर म्हणाले.
 
"उठाव होणार आहे हे तुम्हाला माहिती होतं. पुरेशा प्रमाणात लोक एकत्र येणार नाहीत. तुम्हाला अंदाज आला नाही. कोणी स्वतच्या मनाने गेलेलं नाही.
 
खरोखर एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देतो असं आश्वासन दिलं होतं का? ते तुमच्याबरोबर सदैव राहिले. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जायला नको असं ते सांगत होते. मुख्यमंत्रिपद हा केंद्रबिंदू होता. बाळासाहेबांच्या काळात असा केंद्रबिंदू कधीच नव्हता. ज्यांनी आपल्याला आग्रह केला त्यांच्या आग्रहाला बळी का पडलात
 
हिंदुत्वासाठी उठाव आहे. कांग्रेस- राष्ट्रवादीला व्यासपीठावर का घेतलं? असा सवाल केसरकर यांनी केला.
 
तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं?
"मराठी माणसांसाठी काय झालं याचं उत्तर द्यावं लागेल. शेतकऱ्यांना मोफत वीज बिल द्यायची होती. अडीच वर्षात झालं नाही, आम्ही दोन महिन्यात केलं. पेट्रोल डिझेलचे दर कमी केले", असं केसरकर म्हणाले.
 
"भाजपबरोबर जायला तुम्ही कबूल होतात. तुम्ही मुख्यमंत्री असाल तर भाजप चालतंय, मुख्यमंत्रिपद नसेल तर भाजपला शिव्या असं धोरण. अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे हे नसताना युती तोडण्याचं काम. युती कायम का ठेवली नाही? खरं बोला. भाजपबरोबर तुम्ही जाणार होता का याचं उत्तर द्या
 
'पॅचअपसाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला'
"आम्ही आमदारकी पणाला लावली आहे. आम्ही विलीन होऊ शकलो असतो. आम्ही शिवसैनिक आहोत म्हणून भाजपमध्ये गेलो नाही. शिवसेना जिवंत ठेवली. 40 आमदार, 10 अपक्ष आमदार बरोबर आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीचं नाव घ्यायचं नाही. आम्हाला दोष दिला जातो. राष्ट्रवादीने अनेक प्रकल्प मागे ठेवले. शिवसेनेच्या रक्षणासाठी लढाई होती", असं केसरकर म्हणाले.
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन हिंदुत्व जपता येतं का? एखाद्याची दाढी आहे म्हणून त्याला औरंगजेब म्हणायचं. वैयक्तिक टीका करणं, लोकांना दुखावणं साफ चुकीचं आहे. तुम्हाला पॅचअप करण्याची संधी होती. याचं उत्तर द्या शेवटच्या क्षणापर्यंत सेना-भाजप एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले.वापरायचं आणि फेकून द्यायचं हे मान्य नाही
 
दरम्यान आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटानं निवडणूक आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठीचे पर्याय दिले आहेत.
 
त्यानुसार, शिंदे गटानं पुढील पक्षासाठी 3 नावांचा पर्याय सुचवला आहे.
 
शिवसेना बाळासाहेब ठाकरे
बाळासाहेबांची शिवसेना
शिवसेना बाळासाहेबांची
शिंदे गटानं चिन्हांसाठी 3 पर्याय सुचवले आहेत. यामध्ये,
 
त्रिशूळ
उगवता सूर्य
गदा
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितलं की, "ठाकरे गटाला त्रिशूळ आणि उगवता सूर्य घेण्याचा अधिकार नाही. ही निशाणी हिंदुत्वाची आहेत. त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे. आम्ही पक्षाचं नाव आणि चिन्हांसाठी निवडणूक आयोगाला पत्र दिलंय. आता आयोग निर्णय घेईल."
 
विशेष म्हणजे शिंदे गट आणि उद्धव ठाकरें गटांची दोन चिन्हं (त्रिशूळ आणि उगवता सूर्य) सारखी आहेत. तर पक्षासाठी सुचवलेलं शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नावसुद्धा सारखंच आहे.
 
निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय शनिवारी (08 ऑक्टोबर ) घेतला. यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आयोगाच्या या निर्णयाला आव्हान देत तीन नावांचा तसंच चिन्हांपैकी एक मिळावं यासाठी पत्र दिलं.
 
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नावासाठी खालील तीन पर्याय दिले आहेत.
 
शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिवसेना (बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे)
याबरोबरीने चिन्हासाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल हे तीन प्रस्ताव देण्यात आले आहेत.
 
यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, "लवकरात लवकर चिन्ह मिळालं तर आम्ही जनतेकडे जाऊन कौल मागू."
 
शिवसेनेनी उगवता सूर्य, मशाल या चिन्हांवर याआधी निवडणुका लढवल्या आहेत. तर त्रिशूळ हे देखील धनुष्यबाणाप्रमाणेच हिंदू देवतांचे आयुध आहे. त्यामुळे ते मागितले असण्याची शक्यता आहे.
 
नवीन चिन्ह हे कदाचित शिवसेनेसाठी क्रांती घडवेल -संजय राऊत
"एखादं चिन्ह गोठवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. इंदिरा गांधीदेखील अशाच परिस्थितीला सामोरं गेल्या होत्या. काँग्रेसचं चिन्ह तर तीनवेळा गोठवलं गेलंय, जनता दलाचंही चिन्ह गोठवण्यात आलं होतं. नावात काय आहे? शिवसेना नाव जरी गोठवलं तरी खरी शिवसेना कोणाची?, हे सर्वांना ठाऊक आहे," अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
 
ते पुढे म्हणाले, "अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीपूर्वी 'धनुष्यबाण' आणि 'शिवसेना' हे नाव शिंदे गटाला इतक्या सहजासहजी मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक संताप आहे."
 
या प्रकरणाचा तिढा कसा सुटू शकतो?
 
शिंदे आणि ठाकरे गटातील प्रकरणाचा तिढा कसा सुटू शकतो याबाबत आम्ही घटनातज्ज्ञ डॉ. उल्हास बापट यांना विचारले. त्यांनी सांगितले की "16 आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराच्या व्याख्या स्पष्ट होणं महत्त्वाचं आहे. पण हे सर्व होण्यासाठी 5-6 महिने वेळ लागला असता.
 
"त्यामुळे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे जाण्यास सांगितलं. सेपरेशन ऑफ पॉवर असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. त्यानुसार निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोग पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबत निर्णय देईल," डॉ. बापट सांगतात.
 
सद्यपरिस्थितीनुसार निवडणूक आयोगासमोर असलेल्या प्रकरणात देखील गुंतागुंत वाढली आहे. दोन्ही गटांनी एकसारखीच नावे मागितली आहेत. एकसारखीच चिन्हं मागितली आहेत. अशा वेळी काय होऊ शकतं असं विचारलं असता बापट सांगतात, "इंग्लंडमध्ये कायदा आहे त्यानुसार ज्या पक्षाने आधी चिन्ह मागितले त्यांना दिले जाते. पण भारतात नेमके कसे होईल याबाबतचा अंदाज आताच घेता येऊ शकणार नाही. जी चिन्हांवर विरोधी गटाने दावा केला नाही कदाचित ते चिन्ह दिलं जाऊ शकतं."
 
Published By - Priya Dixit