शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: परभणी , गुरूवार, 3 ऑगस्ट 2023 (08:01 IST)

संभाजी भिडेंना तात्काळ अटक करण्याची मागणी

sambhaji bhide
Demand for immediate arrest of Sambhaji Bhide गेल्या अनेक दिवसापासून संभाजी भिडे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी फिरुन जातीय तेढ निर्माण करणारे वादग्रस्त विधाने करीत आहेत. थोर समाज सुधारक महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर घृणास्पद टिपणी केली आहे. भिडे भिमा कोरेगांवच्या दंगलीचे देखील मुख्य सुत्रधार आहेत. परंतु तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यास क्लिन चिट दिल्यामुळे बेताल वक्तव्याचा परवाना मिळाल्यागत सामाजिक वातावरण दुषित करण्यात येत आहे. यामुळे फुले, शाहू, आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. वरील वक्तव्य प्रकरणी संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यास त्वरीत अटक करावी या मागणीसाठी भिमशक्तीचे संस्थापक नेते माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासह परभणीत तीव्र निदर्शने करण्यात आली.
 
या आंदोलनाचा भाग म्हणून परभणी भिमशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. भिडे यांनी ज्यांची बदनामी केली आहे ते सर्व राष्ट्रपुरुष आहेत आणि तमाम बहुजनांचे आदर्श आहेत. त्यामुळे संभाजी भिडेंवर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून स्थानबध्द करावे यासाठी भिमशक्तीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भिडे यांना अटक न झाल्यास मिमशक्ती संघटना रस्त्यावर उतरुन व्यापक आंदोलन करील असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.