1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (23:35 IST)

वीज कंपन्यांच्या सर्व कर्मचारी संघटने बरोबर उद्या मुबंईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा

devendra fadnavis
शासकीय महावितरण महानिर्मिती व महापारेषण वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचारी आणि अभियंता तंत्रज्ञ कर्मचारी , कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी मंगळवार 4 जानेवारी ते 6 जानेवारी पर्यंत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. उद्या संपात सहभागी असलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या 4 जानेवारी 2023 दुपारी एक वाजेच्या सुमारास मुंबईत सह्याद्री अतिथी गृहात होणार आहे. सर्व संघटनेच्या  पदाधिकाऱ्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती महावितरणाकडून देण्यात आली. 

Edited By - Priya Dixit