1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Deputy Chief Minister Eknath Shinde admitted to hospital

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कालपासून सौम्य ताप, अशक्तपणा आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांची नियमित तपासणी सुरू आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे कोणतेही कारण नाही आणि त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून दिल्लीतील वारंवारचे दौरे आणि सरकारी बैठकांमुळे त्यांना विश्रांती घेता आली नाही, ज्यामुळे शारीरिक अशक्तपणा आणि ताप आला आहे. पुढील काही दिवसांतील त्यांचे सर्व सरकारी दौरे, बैठका आणि राजकीय कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहे. अशी माहिती समोर आली आहे.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
धनश्री नाईक
गेल्या दोन वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या धनश्री नाईक सध्या 'वेबदुनिया'च्या मराठी विभागात कनिष्ठ संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांव्यतिरिक्त स्थानिक समस्या आणि घडामोडींना व्यासपीठ मिळवून देण्याकडे धनश्री यांचा कटाक्ष असतो. तळागाळातील बातम्या सोप्या भाषेत मांडणे हे.... आणखी वाचा
पुढील लेख
शनिवारी मुंबई आणि ठाण्यासह चार शहरांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी