महायुतीत वाद असल्याचा अफवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळल्या
महायुतीत काही ठीक नसल्याच्या चर्चा सध्या समोर येत आहे. महायुतीत फूट पडली आहे अशा अफवांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावल्या आहे. ते म्हणाले, जर महायुतीत काही समस्यां असतील तर त्या चर्चा करून सोडवू.
प्रसार माध्यमांना सांगताना ते म्हणाले, महायुतीत सर्व काही ठीक आहे. काहीही मतभेद नाही. आम्ही तक्रार करत नाही काम करतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कडे अजित पवारांची तक्रार केल्याच्या वृत्तावरून ते बोलत होते.
या वरून अजित पवारांना विचारले असता एकनाथ शिंदेंना जर काही सांगायचे असेल तर त्यांनी माझ्याशी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बोलावे.आमच्यातील नाते चांगले आहे. काहीही वाद नाही असे ते म्हणाले.
Edited By - Priya Dixit