गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (20:38 IST)

अजित पवार यांना कोरोनाची लागण

ajit pawar
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. अजित पवार यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. याआधी राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. ट्विट असे होते की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.