मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (08:44 IST)

राष्ट्रवादीला जेरीस आणण्यासाठी देशमुख,मलिकांना अटक-जयंत पाटील

jayant patil
राष्ट्रवादीला जेरीस आणण्याचा प्रयत्न सत्तारुढ केंद्र सरकारने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करून सातत्याने केला. महाराष्ट्रात मविआ सरकार अडचणीत आणण्यासाठी अनेक कारवाया करण्यात आल्या, त्यातील या दोन कारवाई आहेत. आज अनिल देशमुख यांची सुटका होतेय. आम्हाला आनंद वाटतोय. न्यायाच्या न्यायदेवतेकडे है लेकिन दुरुस्त आए अशी जी म्हण आहे ती खरी ठरली. देशमुखांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे, महाराष्ट्रातील कार्यकर्ते उत्सुक आहेत. थोड्याच वेळात ते बाहेर येतील आणि महाराष्ट्रासाठी पुन्हा धडाडीने काम करतील असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले, अनिल देशमुखांवर झालेली कारवाई , मागचे तेरा महिने कोणीच भरुन काढणार नाही.मात्र न्यायालयाने न्याय केला.कोणताही आरोप सिध्द न होता एखाद्याला अटक करण हे फक्त भारतातच घडू शकतं.आज या सर्व गोष्टींचा निषेध करतो आणि अनिल देशमुखांचे राष्ट्रवादीकडून स्वागत करतो. आज अनिल देशमुखांची सुटका होतेय तसेच नवाब मलिक यांच्याबाबतही असेच होईल अपेक्षा आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor