मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 डिसेंबर 2022 (15:41 IST)

जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेणार का ?......

In the winter session
हिवाळी अधिवेशनात गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचे  निलंबित करण्यात आले. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्याची विनंती केली आहे. 
 
'मागिल आठवड्यात जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली. एवढी कठीण शिक्षा करणे बरोबर नाही. म्हणून मी तुम्हाला कारवाई मागे घेऊन सहभागी करुन घेण्याची विनंती केली होती. मीही शांतपणे भूमिका घेतली. अध्यक्ष महोदय तुम्हीही सामंजस्य भूमिका गेतली होती. उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही मनाचा मोठेपण दाखवून पाटील यांच्यावरील कारवाई मागे घ्याल अस मला वाटतं, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. 
 
 अजित पवार यांना प्रत्युत्तर देताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री महोदय सध्या सभागृहात उपस्थित नाहीत. ते उपस्थित झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

Edited By- Ratnadeep Ranshoor