ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय तसेच स्वतंत्र मंत्री नेमणार
ओबीसींच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेता त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय तसेच स्वतंत्र मंत्री नेमण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. ते कोकण विभागीय कुणबी महोत्सव -2016 च्या समारोपप्रसंगी शहापूर येथे बोलत होते. राज्यासाठी कुणबी समाजाने मोठा लढा दिला आहे. शेतीत उत्तम काम करणारे हात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तलवार हाती घेऊ शकतात. हे कुणबी समाजाने सिद्ध केले आहे. त्यांच्या ऋणातून उतराई झाले पाहिजे, अशी माझी भावना आहे. या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.