मंगळवार, 20 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मार्च 2017 (15:46 IST)

मुख्यमंत्र्यांनी दिला सामूहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांना इशारा

dvendra fadnavis
'रुग्णांना मरणाच्या दारात सोडणार असाल, तर तुम्हाला माफ करणार नाही', असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामूहिक रजेवर गेलेल्या डॉक्टरांना दिला आहे. डॉक्टरांवर होणा-या हल्ल्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं. यावेळी बोलताना त्यांनी डॉक्टरांच्या या वागण्यावर संताप व्यक्त करत ताशेरे ओढले. तसंच कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. 'सामान्य नागरिकांच्या पैशातून डॉक्टरांना शिक्षण मिळतं. जनतेच्या पैशातून फी दिली जाते हे विसरु नका, त्यांना मरणाच्या दारात सोडणार असाल, तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही', असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरला आहेत. 'डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला पण त्यांचं वागणं देवासारखं नाही', अशी टीका त्यांनी केली. तसंच 'डॉक्टरांना आपल्या शपथेचा विसर पडला आहे', असा टोलाही यावेळी हाणला.