मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2017 (14:16 IST)

हायकोर्टाने सांगण्याची गरज नाही - मुख्यमंत्री

महाराष्ट्रात शेतकरी वर्गाला कर्जमाफी कधी आणि कशी करायचा हा पूर्ण आमचा विषय आहे, त्यासाठी हायकोर्टाने सांगण्याची गरज नाही. राज्य सरकार त्यासाठी सक्षम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. उत्तर प्रदेशात कर्जमाफी जाहीर करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्रात कर्जमाफी कधी जाहीर होणार असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीवर विधानसभेत निवेदन दिलं आहे. मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला कर्जमाफीसंबंधी दिलेल्या आदेशावर बोलताना 'हा विषय संपुर्ण वेगळा असून कर्जमाफीसाठी आम्हाला हायकोर्टाने सांगण्याची गरज नाही', असं मुख्यमंत्र्यांनी बजावून सांगितलंआहे. प्रत्येक वेळी कोर्ट आणि त्यांचे निर्णय येतो त्यामुळे सरकार काहीच करत नाही असे मत नागरिकांचे होते मात्र जर सरकार काम कर असेल तर पत्येक वेळी कोर्टाने निर्णय देवू नये असे काहीसे मत सरकारचे असेल असे मत अनेक तज्ञ व्यक्तीने व्यक्त केले आहे.