Devendra Fadnavis Japan tour: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या जपान दौर्यावर
Devendra Fadnavis Japan tour :राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या जपानच्या दौऱ्यावर काल संध्याकाळी रवाना झाले असून ते जपान मध्ये अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेट देणार आहे. ते या वेळी जपान- इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. तसेच फडणवीस जेरा, जायका सारख्या गुतंवणूकदारांची भेट घेणार आहे.
राज्यातील अनेक प्रकल्पना जायकाने अर्थसाहाय्य केले आहे. जायकाने या पूर्वी विविध प्रकल्पांसाठी मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रो-3 नागपूर नागनदी शुद्धीकरण, बुलेट ट्रेन सारख्या राज्यातील अनेक प्रकल्पांना आर्थिक पुरवठा केला होता. काही कंपन्यांशी गुंतवणुकी करण्याच्या संदर्भात त्यांच्या बैठका होणार आहे. टोकियो मेट्रो ऑपरेशन्स आणि जपानच्या बुलेट ट्रेन ला ते भेट देणार आहे. तसेच या दौऱ्यात जपानात वाकायामा शहराला देखील ते जाणार आहे.
Edited by - Priya Dixit