बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 डिसेंबर 2017 (10:08 IST)

'शोध मराठी मनाचा' संमेलनात दिग्गजांच्या मुलाखती

जागतिक मराठी अकादमी तर्फे भरवण्यात येणारं 'शोध मराठी मनाचा' हे संमेलन येत्या १ ते ३ जानेवारी दरम्यान पुण्यात होणार आहे. या संमेलनाचा समारोप शरद पवार यांच्या मुलाखतीनं होणार आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पवारांची मुलाखत घेणार आहेत. असं असलं तरी या संमेलनाचं हे एकमेव वैशिट्य नसल्याचं आयोजकांनी म्हटलंय.
 
जगभरातील विविध क्षेत्रांत यशस्वी ठरलेल्या नामवंत मराठी जणांच्या मुलाखती या ३ दिवसांत होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत उदघाटन सत्रात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील मुलाखत संमेलनात होणार आहे. या संपूर्ण संमेलनाचा तपशील येत्या २० डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.