मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 डिसेंबर 2017 (09:50 IST)

ट्रिपल तलाक विधेयक मंत्रिमंडळात मंजूर

मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक म्हणजे ट्रिपल तलाक विधेयक शुक्रवारी मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आलं.  सरकार या बिलाला संसदेत सादर करणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे विधेयक संसदेतील शीतकालीन सत्रातील सरकारचा मुख्य अजेंडा आहे. तीन तलाकाच्या प्रस्तावात एका कायद्याच्या मसुद्यात असं सांगितलं आहे की, तीन तलाक चुकीचे आहे. असं करणाऱ्या व्यक्तीला ३ वर्षाची शिक्षा होऊ शखते. 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समूहाद्वारे चर्चा करून हे बिल पास करण्यात आले आहे. या विधेयकाच्या ड्राफ्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, दोषिंना ३ वर्षाची शिक्षा आणि दंड लावण्यात येणार आहे. हा एक अपराध समजला जाणार आहे. तसेच यामध्ये पीडित महिलेला भत्ता आणि नाबालिक मुलं असल्यास त्यांची कस्टडी द्यावी याचा समावेश करण्यात आला आहे.