1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 मे 2023 (08:15 IST)

नरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका

devendra fadnavis
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात जमिनी उपलब्ध करून सौरऊर्जा प्रकल्प आणण्याचा मानस आहे.शेतकऱ्यांचे अवकाळी पावसात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत पोहचवली आहे. ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही त्याची माहिती घेवून 15 दिवसात मदत पोहचवणार आहे.जलयुक्त शिवार या योजनेचा देखील आढावा घेतल्याचे फडणवीसांनी सांगितले. 167 गावांमध्ये जलयुक्त शिवार 2 ची कामं सुरु करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.यावेळी विविध विकासकामांचं फडणवीसांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विरोधकांवरही त्यांनी टिका केली.
 
अरविंद केजरीवाल यांनी  उध्दव ठाकरेंची भेट घेतली. ते शरद पवारांच्या भेटीला गेले. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले,मला अतिशय आनंद होत आहे. ज्या केजरीवालांनी शरद पवार यांच्याविषयी असे-असे शब्द वापरले आहेत की, मी ते वापरू शकत नाही.त्याची व्हिडिओ क्लीप व्हायरल होत आहे.उध्दव ठाकरे आणि शिवसेनेविषयी केजरीवाल काय बोलले आणि ठाकरे केजरीवाल यांच्याविषयी काय बोलले हे सगळ्यांना माहित आहे.मोदींना विरोध करण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor