रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (21:06 IST)

केदारनाथ यात्रेला गेलेल्या नाशिकच्या भाविकाचा वाटेत मृत्यू…

death
सिडको परिसरातील रहिवासी बाळासाहेब डोंगरे हे केदारनाथ यात्रेला गेले असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांचा मृतदेह नाशिकला आणण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी विशेष प्रयत्न केले असून उद्या शनिवारी त्यांचा मृतदेह नाशिक मध्ये येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.
नाशिक येथील जुन्या सिडको मधील रहिवाशी बाळासाहेब सीताराम डोंगरे हे केदारनाथ यात्रेला गेले असताना गुप्त काशी येथे त्यांचा काल हार्ट अटॅकने दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यांना रूद्र प्रयागला सरकारी वैदयकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यांची वैद्यकीय प्रक्रिया पार पाडली असून पार्थिव नाशिक येथे आणण्यात येणार आहे. या घटनेमुळे सिडकोत शोककळा पसरली आहे.

मी स्वतः तेथील डॉक्टरांशी बोललो आहे. उद्या सकाळ पर्यंत पार्थिव नाशिक येथे आणण्यात येईल. आपत्ती विभागाची टीम देखील संपर्कात असून कुटुंबीयांना हा मोठा धक्का आहे. त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, त्यांना सावरण्याची ताकद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

– दादाजी भुसे पालकमंत्री नाशिक
 
Edited By - Ratnadeep Ranshoor