रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (13:21 IST)

देवरूख –पुलाखाली सापडले बेवारस बाळ

देवरूख – रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्याती पांगरी येथील स्टॉपजवळील पायर्‍याच्या खालच्या बाजूला  अंदाजे 1 वर्षाचे बाळ 4 दिवसांपासून रडत असल्याचे आढळून आले.  मातेच्या अत्याचाराची प्रकरणे रोजच समोर येत आहेत. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
 
याबाबत सविस्तर घटना अशी की, पांगरी येथील हनुमान स्टॉपजवळील गावात 1 वर्षाचे बालक 4 दगडांच्या मधोमध आढळून आले. चार दिवस हे बालक याच ठिकाणी रडत होते. थंडीमुळे गारठल्याने आणि रडून रडून त्याचा घसा बसला होता. मात्र 4 दिवस संपूर्ण गावात मुलाच्या रडण्याचा आवाज आला. जनावरांचा किंवा अन्य कशाचाही आवाज येत असल्याने ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
 
पण आज सकाळी पोलीस आणि ग्रामस्थांना घेऊन सरपंचांनी या ठिकाणी धाव घेतली. तेव्हा ते बालक बेशुद्धावस्थेत दिसत होते. तेव्हा त्या बालकाला रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.