1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 23 जानेवारी 2022 (14:12 IST)

सरोगसीमुळे 'रेडिमेड मुलं' मिळालेल्या मातांना काय वाटतं?-तस्लिमा नसरीन यांचं विधान चर्चेत

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या सरोगसीद्वारे जन्मलेल्या बाळाची चर्चा सुरू असतानाच लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केलेल्या विधानामुळं नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
 
तस्लिमा नसरीन यांनी एक ट्वीट करत सरोगसीद्वारे आई बनणाऱ्या महिलांच्या भावनांवरच प्रश्न उपस्थित करणारं वक्तव्य केलं आहे.

"सरोगसीद्वारे 'रेडिमेड मुलं' मिळतात तेव्हा या मातांना नेमकं कसं वाटतं? प्रत्यक्ष बाळाला जन्म देणाऱ्या आईच्या जशा भावना असतात तशाच त्यांच्याही भावना असतात का?" असं तस्लिमा नसरीन यांनी म्हटलं आहे.

"गरीब महिलांमुळंच सरोगसी शक्य आहे. जर तुम्हाला खरंच एखादं मूल हवं असेल तर अनाथांना दत्तक घ्या. पण हे केवळ स्वार्थीपणा आणि अहंकाराचं लक्षण आहे, असं नसरीन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.