1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (12:49 IST)

पश्चिम बंगाल: हावडा येथील थर्माकोल कारखान्याला भीषण आग

west bengal
पश्चिम बंगालमधून मोठी बातमी येत आहे. हावडा येथे भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. एएनआय न्यूज एजन्सीनुसार, ही घटना हावडामधील डोमजूर पोलीस स्टेशन हद्दीतील राजापूर भागातील आहे. येथील थर्माकोल कारखान्यात आग लागली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
 
यापूर्वी बंगालची राजधानी कोलकाता येथील पार्क शो सिनेमागृहात आग लागली होती. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांद्वारे घटनास्थळी परिस्थिती हाताळण्यात आली. बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.