ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश, दिल्ली आणि भोपाळमधून दहशतवाद्यांना अटक
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी दिल्ली आणि भोपाळमधून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिल्लीतील सादिक नगरमधून एका दहशतवाद्याला आणि दुसऱ्याला भोपाळमधून अटक केली. दोन्ही दहशतवाद्यांची ओळख अदनान अशी आहे. दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांच्या ताब्यातून IED बनवण्याचे साहित्य, लॅपटॉप आणि टायमर जप्त केले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही दहशतवादी आत्मघातकी हल्ल्याचे प्रशिक्षण घेत होते आणि दिल्लीमध्ये हल्ल्याची योजना आखत होते. प्राथमिक तपासात त्यांचे ISI शी संबंध असल्याचे उघड झाले आहे.
हे दहशतवादी पाकिस्तानी गुप्तचर संस्था, ISI च्या इशाऱ्यावर दिल्लीत दहशत निर्माण करण्याचा कट रचत होते का हे शोधण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिस करत आहे.
Edited By- Dhanashri Naik