देशातील पहिली स्वदेशी फ्लाइंग अकॅडमी अमरावतीमध्ये सुरू होणार; भारतीय हवाई वाहतूक आत्मनिर्भर होणार
महाराष्ट्रातील अमरावती येथील बेलोरा विमानतळावरील एअर इंडिया फ्लाइंग अकॅडमीला डीजीसीएची मंजुरी मिळाली आहे.
एअर इंडियाची नवीन फ्लाइंग अकॅडमी महाराष्ट्रातील अमरावती येथील बेलोरा विमानतळावर स्थापन केली जाईल. हा हाय-टेक विमानचालन प्रशिक्षण कॅम्पस सुरू करण्यासाठी डीजीसीएने मंजुरी दिली आहे. अकॅडमीच्या पहिल्या बॅचमध्ये १८० कॅडेट्सना त्यांच्या कमर्शियल पायलट लायसन्ससाठी प्रशिक्षण दिले जाईल.
एअर इंडियाने भारतीय विमानचालन क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. नागरी विमानचालन महासंचालनालयाने महाराष्ट्रातील अमरावती येथील बेलोरा विमानतळावर एअर इंडिया फ्लाइंग अकादमीच्या स्थापनेसाठी अधिकृतपणे मंजुरी पत्र जारी केले आहे.
महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी आणि टाटा ग्रुपच्या मालकीची एअर इंडिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेली ही अकॅडमी अमरावतीमधील बेलोरा विमानतळावर १० एकर परिसरात पसरलेली आहे. या जागतिक दर्जाच्या कॅम्पसचे अंदाजे ९५% बांधकाम पूर्ण झाले आहे. या कॅम्पसमध्ये डिजिटल क्लासरूम, वसतिगृहे, भोजनगृहे, डिजिटल ऑपरेशन्स सेंटर, ब्रीफिंग रूम, हँगर्स आणि विमानांच्या देखभालीसाठी एक विशेष सुविधा यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.
पायलट प्रशिक्षणासाठी बेलोरा विमानतळावर एकूण ३४ अत्याधुनिक प्रशिक्षण विमाने तैनात करण्यात आली आहे. यामध्ये ३१ सिंगल-इंजिन पायपर आर्चर विमाने आणि ३ ट्विन-इंजिन डायमंड DA42 NG विमानांचा समावेश आहे. ही सर्व विमाने आधुनिक गार्मिन G1000 NXi कॉकपिट सिस्टीम आणि ADS-B ट्रॅकिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. याव्यतिरिक्त, कॅडेट्सना प्रत्यक्ष उड्डाणांपूर्वी सरावासाठी तीन फ्लाइट सिम्युलेटर्स उपलब्ध करून दिले जातील.
भारतीय हवाई वाहतूक आत्मनिर्भर होणार???? Air India has received DGCA approval to establish a flying academy in Amravati, Maharashtra. https://t.co/7VJlx2di1w
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) October 30, 2026
अमरावतीमधील या फ्लाइंग अकॅडमीव्यतिरिक्त, एअर इंडियाने गुरुग्राममध्ये ६,००,००० चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या हवाई प्रशिक्षण संस्थेमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. एअर इंडियाचा हा प्रयत्न देशातील वैमानिकांची वाढती मागणी पूर्ण करण्यात आणि भारताच्या विमान वाहतूक व्यवस्थेला आत्मनिर्भर बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

