शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑगस्ट 2017 (12:00 IST)

भ्रष्टाचार झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा सभात्याग, लोकशाहीच्या इतिहासातील पहिलीच घटना - धनंजय मुंडे

विधान परिषदेचे सदस्य किरण पावसकर यांनी देवीपाडा, बोरीवली येथील एसआरए प्रकल्पातील अनियमिततेसंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी एमपी मील कंपाऊंड, घाटकोपर येथील प्रकरणात झालेल्या एक हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याबाबत प्रश्न विचारला. मात्र उत्तर देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी उत्तर नाही म्हणून सभागृहातून पळ काढला. उत्तर देता येत नाही म्हणून विधान परिषदेतील भाजप-शिवसेनेचे लोक पळून गेले. हे राज्याचं दुर्दैव आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत हे लोक सत्तेत आले, आता तेच भ्रष्टाचारांच्या आरोपातून पळवाट काढत आहे. कामकाज नीट चालावं ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र सत्ताधारी पक्ष आपल्या जबाबदारीतून पळ काढत आहेत. पावसाळी अधिवेशनात कामकाज जास्त व्हावे, ही भूमिका विरोधी पक्षाची होती. म्हणून यावेळी खूप कमी सभागृह बंद झाले. एवढे आरोप झाले मात्र एकाची चौकशी झाली नाही. हे सरकार भ्रष्टाचारात बरबटलेले आहे, म्हणून त्यांनी बहिष्कार टाकला, असे मुंडे म्हणाले.