शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (12:16 IST)

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा राजीनामा घ्यावा, धनंजय मुंडे यांची मागणी

dhananjay munde

औद्योगिक विकासासासाठी (एमआयडीसीसाठी) करण्यात येणाऱ्या जमीन संपादनात मोठा घोटाळा झाला असून याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे   यांनी सभागृहात केली.

गोंदेदुमाला, ता.इगतपुरी, जि.नाशिक येथील अधिसुचित जमिनीपैकी काही क्षेत्र उद्योजकांच्या लाभासाठी वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पुढील आठवड्याच्या कामकाजात सविस्तर माहिती सभागृहात पुराव्यांसह सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी उद्योग मंत्री Subhash Desai यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी मुंडे यांनी २८९ द्वारे स्थगन प्रस्ताव मांडून केली.

पीक विमा भरण्याची मुदत ५ ऑगस्टपर्यंत सरकारने वाढवली आहे. . सरकारने याबाबतीत दोन जीआर काढले, म्हणून शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं? असा सवाल विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार  यांनी उपस्थित केला. सरकारची यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. ठप्प झालेल्या यंत्रणेबाबत काही करावं अन्यथा १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.