मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (15:43 IST)

धनंजय मुंडेंचं फेसबुक पेज हॅक, Facebook India आणि Maharashtra Cyber कडे तक्रार दाखल

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी असा संशय व्यक्त करत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. 
 
आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, माझे अधिकृत फेसबुक पेज @DPMunde हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा संशय आहे. याबाबत फेसबुक इंडिया आणि महाराष्ट्र सायबरकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे. 
 
मुंडे यांचे फेसबुक पेजचे लाखो फॉलोअर्स आहेत. राज्याच्या कॅबिनेट मंत्री म्हणून करत असलेली कामं तसचं त्यांचे वैयक्तिक विचार मुंडे त्यांच्या पेजवर अपलोड करत असतात.
 
धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांच्या फेसबुक पेजचा अॅडमिन अॅक्सेस काढून घेण्यात आल्याचा दावा मुंडे यांनी केला आहे. त्यांनी आपलं फेसबुक पेजचा अॅक्सेस पुन्हा प्राप्त करुन देण्याची मागणी फेसबुक इंडियाकडे केली आहे.