बुधवार, 30 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (14:18 IST)

३ वाहनांचा विचित्र अपघात, ४ भाविकांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर जखमी

बुलडाणा जिल्ह्यात चिखली-खामगाव मार्गावर वैरागड गावाजवळ 3 वाहनामध्ये विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारा करिता दाखल करण्यात आले आहे. मोहाडी घाटात बोलेरो- बोलेरो पिकअप व आणि टाटा सुमो या तीन वाहनांचा अपघात झाला.
 
आज सकाळी १० वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला असून अपघात इतका भीषण होता की या अपघातात टाटा सुमोचा चुराडा झाला आहे. दोन मालवाहू बोलेरो सोयाबीनचे पोते घेऊन खामगावकडे जात असताना खामगावकडून चिखलीकडे जाणाऱ्या महावीतरण कंपनीच्या सुमो गाडीला धडकून हा विचित्र अपघात घडला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये ४ जण जागीच ठार झाले आहेत. तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अकोल्यातील भाविक पंढरपूरकडे जात असताना मोहाडीजवळ मालवाहू वाहनाने धडक दिली.
 
अपघातातील मृतांची नावे
श्यामसुंदर रोकडे (५५)- चालक
विश्वनाथ कराड (७२)
शंकुतला कराड  (६८)
बाळकृष्ण खर्चे   (७०)
 
अपघातातील जखमींची नावे
मुरलीधर रोहणकार
सुलोचना रोहणकार
उषा ठाकरे
श्यामराव ठाकरे
अलका खर्चे